बाभुळगाव (Ajit Pawar) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या यवतमाळ दौर्यात आज दि. ३० रोजी सकाळच्या सुमारास बाभूळगाव येथे शिवसेना (उ.बा.ठा.)चे तालुका प्रमुख गजानन पांडे,काँग्रेसचे अक्षय राऊत, प्रदीप नांदुरकर यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार ते पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी जात असताना घडला. या प्रकाराने तालुक्याच्या राजकीय संकुलात एकच खळबळ उडाली होती.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार (Ajit Pawar) यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी बाभूळगावमार्गे यवतमाळला निघाले होते. दरम्यान बसस्थानक चौकात सदरचा प्रकार घडला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी गजानन पांडे, अक्षय राऊत, प्रदीप नांदुरकर यांचेसह काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन बनकर, अतुल देशमुख, मोहन भोयर, कृष्णा ठाकरे, विनोद वाटमोडे, नंदू एकलारे, शिवसेना (ऊ.बा.ठा.) चे शैलेश भगत, प्रहारचे श्रीकांत घोंगडे आदी पदाधिकार्यांना स्थानबद्ध करून पोलीस ठाण्यात नेले. या घटनेमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तर जातानाही तोच प्रकार परत येतानाही तोच प्रकार पुन्हा घडला. अजित पवार (Ajit Pawar) परत जात असताना कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ कॉंग्रेसच्या अतुल राऊत, श्याम जगताप, विपुल बोदडे, अमेय घोडे याचेसह कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्ते स्थानबद्ध केल्यावर सुद्धा पोलीस गाफील राहिल्याने सदरचा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे बाभूळगाव पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ajit Pawar: बाभूळगावात अजित पवार यांना दाखविले काळे झेंडे
 
			



 
		

