उमरगा (Car Fire) : तेलंगणा राज्यातील तिघे मित्र शिर्डी येथे साई दर्शन आटोपून, हैद्राबादकडे परत निघाल्यानंतर उमरगा शहराजवळील दाबका गाव शिवारात राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेली (Car Fire) कार सुरू करताना अचानक लागलेल्या आगीत कारमालकाचा अक्षरशः जळून मृत्यू झाला. रविवारी (दि. १) पहाटे पाचच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ हि भयंकर दुर्घटना घडली.
या बाबतची माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे कार्यरत व पण हैद्राबाद येथे वास्तव्यास असणारे सरकारी शाळेतील शिक्षक सुरेशकुमार पेंटलवल्ली वय ५७ वर्ष हे आपले पुजारी असलेल्या विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम व ड्रॉयव्हर कार्तिक नागय्या कोंडा दोघेही रा. व्यंकटेश्वरा कॉलनी, सरूरनगर हैद्राबाद यांच्यासह बोलोरो कारने (कार नं. टी एस 05 इ झेड 7839) शिर्डी व वेरूळ अजिंठा येथे फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी (दि. ३१) रात्री ते हैद्राबादकडे निघाले होते.उमरगा तालुक्यातील दाबका येथील पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर कार बंद पडली. यातील एक पुजारी मित्र व चालक असलेल्या एकाने कार सुरु करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
शेवटी कार ढकलत पेट्रोलपंपापुढे आणण्यात आली ; जवळपास दीड ते दोन तास (Car Fire) कार सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुजारी विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम हा पेट्रोल पंपावर मेकॅनिक भेटतो का हे पाहण्यासाठी गेले तर दुसरा चालक मित्र रस्त्यालगत बसलेला होता. या दरम्यान सुरेश कुमार पेंटलवल्ली कार सुरु करण्याच्या प्रयत्नात होते. पण कार गरम घेऊन अचानक आगीचा भडका उडाला. त्या वेळी कार शेजारी जमिनीवर बसलेल्या कार्तिक नागय्या कोंडा याने सुरेश कुमार यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यात कार्तिक ही भाजला. कांही क्षणातच संपूर्ण कार (Car Fire) व कारमध्ये अडकलेले सुरेश कुमार आगीच्या भक्षस्थानी पडले. या वेळी सुरेश कुमार यांचे मित्र व आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यानी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत या आगीत शिक्षक सुरेशकुमार कारसह पूर्णतः जळून खाक झाले होते. पोलीस पुढील तपास करित आहेत.
दुपारी अडीचच्या सुमारास मयताचा मुलगा व नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली. दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशीसाठी फॉरेन्सिक टीमने कारची तपासणी केली आहे. तसेच वैद्यकिय पथकाने मयताचे डीएनए नमुने घेतले आहेत.
वयस्कर असलेल्या सुरेश कुमार यांना आग लागल्यानंतर (Car Fire) कारचा दरवाजा उघडून बाहेर पडताच आले नाही. असे चालक असलेल्या कार्तिक कोंडाने सांगितले. तसेच त्यात तोही थोडाफार भाजल्याचे सांगत असला तरी पोलीस सर्वच बाजूने तपास करीत असून आग लागली असताना त्यांचवेळी नेमके दोघेही बाहेर कसे होते. तसेच मयत सुरेश यांचे नातेवाईक काय जबाब देतात व तांत्रिक बाबी तपासावरून नेमके काय झाले हे समजणार आहे.




 
			 
		

