शेतकऱ्यांसाठी उत्तम व गुणवत्ता पूर्ण काम करू अशी हमी दिली!
रिसोड (Board Agriculture Officer) : रिसोड तालुका कृषी विभागामध्ये मंडळ कृषी अधिकारी (Board Agriculture Officer) रिसोड भाग 2 म्हणून गोपाल बोरे यांनी आपला स्वीकारला पदभार स्वीकारला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे कृषी अधिकारी यांनी रिसोड कृषी विभागाच्या (Department of Agriculture) कामकाजाबाबत सविस्तर माहिती देऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा परिचय देऊन शुभेच्छा दिल्या. रिसोड भाग 2 चे कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले यांची वाडा मंगरूळपीर तालुका रोपवाटिका येथे बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त पदावर गोपाल बोरे यांनी रिसोड कृषी विभाग भाग 2 चा आपला पदभार स्वीकारला. बोरे यांनी यापूर्वी सिंदखेडराजा येथील कृषी अधिकारी या पदावर कामकाज पाहिले. त्यांच्याकडे काही काळ सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकाऱ्याचा पदभार सुद्धा होता. मंडळ कृषी अधिकारी म्हणून बोरे यांनी स्वीकारला. पदभार प्रसंगी तालुका कृषी विभागाचे अधिकारी विलास वाघ, मंडळ कृषी अधिकारी विलास बारबईले, सहाय्यक कृषी अधिकारी राहुल पांडे, भागवत पुंड, लक्ष्मण मेहेत्रे, हरिभाऊ ढोणे, प्रकाश कायंदे, एपी देशमुख, वीर देशमुख, मारुती गिरी, प्रसाद जाधव हे उपस्थित होते. नवीन मंडळ अधिकारी यांनी रिसोड तालुका कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) उत्तम व गुणवत्ता पूर्ण काम करू अशी हमी दिली.