हिंगोली (Hingoli Krushi Bazar) : कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ ४ सप्टेंबर रोजी बरखास्त झाल्यानंतर ५ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे (Surekha Phufate) यांनी प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला.
हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Hingoli Krushi Bazar) सिरसम बाजार समिती अंतर्गत ५६ गावांचे समायोजन केल्यानंतर हिंगोली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीबाबत चे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे (Surekha Phufate) यांनी काढले होते. त्यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली असताना ५ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रशासक पदाचा पदभार स्विकारला.
यावेही कृषि उत्पन्न बाजार समितीचे (Hingoli Krushi Bazar) सचिव नारायण पाटील तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील बालाजी पठाडे यांची उपस्थिती होती. यावेळी पदभार स्विकारल्या नंतर प्रशासक सुरेखा फुफाटे (Surekha Phufate) यांनी दै. देशोन्नतीशी बोलताना सांगितले की, हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील मोठी समिती असुन भुसारासह हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. शेतकर्यांच्या शेती मालाला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यासह विदर्भ व इतर जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला शेती माल विक्री करण्याकरीता आणतात.
हळद विक्री करीता काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात ही गैरसोय होऊ नये, या दृष्टीने लक्ष घातले जाईल. तसेच बाजार समितीत टिनशेड उभारणीकरीता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे पाठपुरावा करून जवळपास २० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला जाईल. यासोबतच (Hingoli Krushi Bazar) बाजार समितीत सोलार पॅनल उभारले जाणार असुन हा परिसर सौर उर्जेने उजळून निघणार आहे. कर्मचार्यांच्या वेतनाचाही प्रश्न मार्गी लावला जाईल, असा ग्वाही (Surekha Phufate) त्यांनी बोलताना दिली.