Nagpur Murder Case:- सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पोलीस बंदोबस्त वाढलेला असून यादरम्यान शहरात धक्कादायक दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामटेक नगरमध्ये शुक्रवारी झालेल्या वादातून पिता-पुत्राची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
वादातून पिता-पुत्राची निर्घृण हत्या
सावरकर फर्निचरचे मालक आणि त्यांचा मुलगा यांच्याकडे फर्निचरचा मोठा व्यवसाय आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवसापूर्वी पीडित आणि आरोपी यांच्यात खूप मोठे भांडण झाले असून एकमेकांना जीवे मारण्याची धमकी वैगरे देण्यात आली होती. त्याच झालेल्या भांडणातून हा हल्ला झाला असून हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांचा वापर केल्याने पिता-पुत्र दोघेही जागीच ठार झाले. या भांडणात एक आरोपी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजनी पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा(crime of murder) दाखल करून सविस्तर तपास सुरू आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे, विशेषत: हाय-प्रोफाइल हिवाळी विधानसभा अधिवेशनादरम्यान ही घटना समोर आली आहे.




