मालेगाव (Bramhanwada Sarpanch) : घरकुल लाभार्थ्यांचे पैसे का देत नाही ? असे म्हणून गटविकास अधिकारी मालेगाव यांच्या अंगावर पैसे फेकले व त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि कार्यालयामध्ये जोरजोराने ओरडुन राडा केल्या प्रकरणी (Bramhanwada Sarpanch) ब्राह्मणवाडा येथील सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरे यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव रमेश सदाशिव कंकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ जुन २०२५ रोजी दुपारी १२:२५ वाजताचे सुमारास ते आणि त्यांचा शिपाई सलीम शहा खाकी शहा असे पंचायत समिती ऑफिसमध्ये ड्युटीवर असताना तेथे (Bramhanwada Sarpanch) ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा येथील सरपंच गोपीनाथ नागरे हे कार्यालयामध्ये आले.
त्यावेळी फिर्यादी व गटविकास अधिकारी व्ही एल खेडकर आणि विस्तार अधिकारी आरोग्य दिलीप देवकते तसेच विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे व स्वप्नील खंडारे , शिपाई सलीम शहा व इतर कर्मचारी असे आरोग्य विभागाच्या सभेसाठी हॉलमध्ये जात असताना तेथे गोपीनाथ नागरे हे आले व त्यांनी गट विकास अधिकारी खेडकर यांचे सोबत जोरात बोलून त्यांचे अंगावर पैसे फेकले आणी हे घ्या पैसे आणि घरकुल लाभार्थ्यांचे पैसे सोडा असे बोलून त्यांची व्हिडिओ शूटिंग केली व कार्यालयामध्ये जोरजोरात ओरडुन राडा केला. त्यामुळे (Bramhanwada Sarpanch) कार्यालयातील कर्मचारी देखील बाहेर आले.
गोपीनाथ नागरे हे जोरजोरात ओरडत असल्याने कार्यालयात अशांतता निर्माण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने (Bramhanwada Sarpanch) कार्यालयात एकच गोंधळ सुरू झाला व त्यामुळे गट विकास अधिकारी खेडकर यांनी पोलिसांना फोन लावून बोलावून घेतले. पोलिसांनी तिथे येऊन शांतता निर्माण केली व या प्रकरणी फिर्याद देण्यास सांगीतले. अशा प्रकारच्या फिर्यादी वरून मालेगाव पोलिसांनी सरपंच नागरे (Bramhanwada Sarpanch) यांच्याविरुद्ध बी एन एस २२१ नुसार कारवाई केली असून, पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत .