खाजगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले!
लातूर (Bribe Case) : तालुक्यातील काटगाव येथील एका लाभार्थ्यांचे घरकुलाचे 30 हजारांचे बिल दोन वर्षापासून शिल्लक होते. ही रक्कम काढून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना लातूर पंचायत समितीच्या (Latur Panchayat Samiti) घरकुल विभागातील अभियंता सचिन बालाजी राठोड यांच्यासह एका खाजगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असून, तिसन्या हप्त्याचे 30 हजार रुपये मिळण्यासाठी पंचायत समिती, लातूर येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना विनंती केली असता 10 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Bribery Department) करण्यात आली.
खासगी व्यक्ती विकास राम चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल!
त्यानुसार गुरुवारी पथकाने पंचायत समितीच्या घरकुल विभागात सापळा लावला असता, पंचासमक्ष अभियंता बालाजी राठोड याने घरकुल तिसऱ्या हप्त्याची रक्कम 30 हजार रुपये खात्यावर टाकण्यासाठी 13 हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम अभियंता राठोड याने विकास राम चव्हाण (29, रा. कृष्ण नगर, काटगाव) या खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले. यावेळी तक्रारदाराने विकास चव्हाण यांच्याकडे दहा हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी ही रक्कम कागदात गुंडाळून अभियंता राठोड यांच्याकडे दिली असता, पथकाने (Squad) दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) अभियंता बालाजी राठोड, खासगी व्यक्ती विकास राम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.




 
			 
		
