तातडीने दुरुस्ती करावी ग्रामस्थांची मागणी!
परभणी (Bridge Pits) : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी ते धारासूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खळी गावाजवळील पुलावर खड्डे झाल्यामुळे लोखंडी गज (Iron Yard) उघडे पडल्याने पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे. पुलावरील खड्डे व उघड्या पडलेल्या गजांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांची (Villagers) केली आहे.
पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली!
गंगाखेड ते परभणी रस्त्यावर असलेल्या तालुक्यातील खळी पाटी येथून ब्रम्हनाथवाडी, चिंचटाकळी, गोंडगाव, मैराळसावंगी आणि धारासूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील खळी गावाजवळील पूल सध्या अपघातप्रवण बनला आहे. पुलावर मोठमोठे खड्डे (Pits) पडले असून, पुलाच्या स्लॅबवरील लोखंडी गज उघडे पडले आहेत. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जणू काही तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या (Rainy Season) तोंडावर ही स्थिती अत्यंत गंभीर बनली असुन खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा (Biker) तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
तातडीने पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी!
सध्या या पुलावरून दुचाकी वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले असल्याने परिसरातील ग्रामस्थ (Villagers) व वाहन चालकांमध्ये पूला विषयी प्रचंड नाराजी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) याकडे लक्ष देऊन तातडीने पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहन धारकांतुन केली जात आहे. संबंधित विभागाने वेळेवर उपाययोजना (Measures) न केल्यास पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अधिक मोठे अपघात घडू शकतात असे ग्रामस्थांतुन बोलल्या जात असुन त्यास जबाबदार कोण असणार? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. अपघातांच्या (Accidents) घटना थांबविण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे आणि त्वरित दुरुस्तीचे काम (Repair Work) हाती घ्यावे अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.