परभणीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सोने, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरली!
परभणी (Burglary) : शहरातील कृषी नगर भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तराव रेंगे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या -चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम पळविली. ही घटना शनिवार 14 जून रोजी भर दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान घडली असून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी व उपविभागीय अधिकारी संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक व डॉग् स्कॉट घटनास्थळी भेट!
निवृत्त शिक्षक रेंगे व त्यांची पत्नी सकाळी 10.30 वाजता गावाकडे सोयाबीनची पेरणी करण्यासाठी निघून गेले. घरी त्यांची मुलगी विद्या रेंगे ही होती. ती देखील दुपारी परीक्षेच्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेली. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरूम मध्ये जाऊन लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील 75 हजार रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. मुलगी विद्या परीक्षेवरून दुपारी 3.30 वाजता घरी आली असता, तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले. तिने आई-वडिलांना फोन करून चोरी झाल्याची कल्पना दिली. घराची तपासणी केली असता कपाटातील साहित्य चोरून चोरटे घराच्या मागच्या दरवाजाने पळून गेल्याची परिस्थिती दिसली. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांच्या (Thief) विरोधात रेंगे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. भर दिवसा कृषी नगरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास सपोनि. कासले हे करत आहेत.




