सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल लंपास!
परभणी (Burglary) : परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून १ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १९ ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पांढरे यांनी तक्रार (Complaint) दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी १८ ऑक्टोबरच्या रात्री १० ते १९ ऑक्टोबरच्या सकाळी ६ या दरम्यान फिर्यादीच्या घरातील लोखंडी पेटीमधील सोन्याची बोरमाळ, सोन्याचे मंगळसूत्र असे १ लाख ३० हजाराचे दागिने आणि ४ हजार रुपये रोख चोरुन नेले. घटनेची माहिती पालम पोलिसांना (Palam Police) देण्यात आली. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोउपनि. नागरगोजे करत आहेत.
सोलार प्लांट मधुन ७० हजाराचे साहित्य चोरीला!
मानवत : तालुक्यातील रेणुपावर सोलार प्लांट रत्नापूर शिवारातुन अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले. दिपक पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १९ ऑक्टोबरला मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ह. सोळंके करत आहेत.




