चंद्रपूर (Bus-Bike Accident) : बाबुपेठ भागातील जुनोना मार्गावर ३४ वर्षीय इसमाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि.३० सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. राकेश गौतम तेलंग असे मृतक युवकाचे नाव आहे. यावेळी जुनोना मार्गावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. (Bus-Bike Accident) मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी आंदोलन केले मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मृतक राकेश गौतम तेलंग हा आपल्या दुचाकीने घराकडे जात होता, त्यावेळी मार्गावर चारचाकी वाहन थार हे उभे होते अचानक त्या वाहनातील इसमाने दरवाजा उघडला, यामुळे राकेश चे दुचाकीवरील नियंत्रण सुटले असता त्याची दुचाकी थेट (Bus-Bike Accident) एसटी बसच्या मागच्या चाकात सापडली. राकेश सुद्धा दुचाकीसह मागच्या चक्क्यात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.