50 प्रवासी बालबाल बचावले; भीषण आगीत बस जळून खाक
औंढा नागनाथ (Bus fire) : औंढा नागनाथ ते वसमत राज्य रस्त्यावर औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी जवळ कर्नाटक राज्यातील जमकंडी जिल्हा बिजापूर येथून खाजगी यात्रा कंपनीची बस क्रमांक एम एच 04 जी.पी 1297 ही बस 50 महिला पुरुष प्रवासी घेऊन औंढा नागनाथ कडे येत असताना या बसने आज 7 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वगरवाडी जवळ अचानक पेट घेतला यामध्ये बसमधील 50 महिला पुरुष प्रवासी बाल बाल बचावले आहेत.
माहिती मिळताच औंढा नागनाथ नगरपंचायत च्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व (Bus fire) आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रोद्ररूप धारण केले यामध्ये प्रवासी नागरिकांचे कपडे, पैसा व सर्व साहित्य जळून खाक झाले. यादरम्यान नांदेड कडून औंढा जिंतूर टी पॉइंट मार्गे छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी व छत्रपती संभाजी नगर कडून नांदेड कडे जाणारी वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती.
यादरम्यान पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, उपनिरीक्षक अफसर पठाण, साह्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, जमादार संदीप टाक गजानन गिरी माधव सूर्यवंशी, सुभाष जयताडे, खयामुद्दीन खतीब यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक थांबवली व (Bus fire) आग विझवल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.