कळमनुरी (Pahelgam Terrorists Attack) : कश्मीर मधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी (Pahelgam Terrorists Attack) केलेल्या गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कळमनुरी च्या वतीने कॅण्डल रॅली काढून घटनेचा निषेध नोंदवला.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या आदेशाने 23 एप्रिल रोजी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कळमनुरी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अवधूत निळकंठे यांनी कॅण्डल रॅली काढून जम्मू-काश्मीर येथील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी (Pahelgam Terrorists Attack) सदर घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला.