वाहतुक पोलीस घटना स्थळी दाखल!
कामठा फाटा (Car Accident) : कामठा फाटा येथे रोड क्रमांक १६१ अकोला-हेद्राबाद रोडवर सकाळी ८.३० दरम्यान नांदेडहुन – वाशीमकडे जाणार्या चारचाकी कारने साळवा येथील नागेश गणेशराव माखने हे शेतकरी साळवा ते कामठा फाटा येथे बैल (Bull) घेवुन येत असतांना तो शेतकरी रस्ता ओलांडतांना नादेहडहुन येत आसलेली कार एमएच ३७ व्ही २५७० या नंबरची गाडी जवळपास ८० ते ९० स्पिड होती. यावेळी हा शेतकरी रस्ता ओलांडताना आपले बैल समोर असतांना कार चालकाला न दिसल्याने तो आपघात झाला यावेळी दोन्ही बैल जाग्यावर मरण पावले. यावेळी आखाडा बाळापूर येथील पोलीस निरिक्षक विष्णूकांत गुठ्ठे, शिंदे, बीट जमादार राजु घोगडे, हिवरे, पोलीस पाटील गजानन मोरे यांच्यासह वाहतुक पोलीस घटना स्थळी पोहचले. यावेळी परीसरातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात होते. पुढील तपास आ.बाळापुर येथील पोलीस अधिकारी करीत आहे.