हिंगोली (Car-Bike Accident) : औंढा नागनाथ ताललुक्यातील काठोडा पाटीजवळ सोमवारी कार व मोटर सायकलचा समोरा समोर अपघात झाला. ज्यामध्ये दुचाकीवरील दोनजण ठार झाल्याने (Car-Bike Accident) मृतदेह औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यामध्ये एक चिमुकली जखमी झाली आहे. या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ ते नांदेड रस्त्यावरील काठोडा पाटीजवळ ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान मोटर सायकल क्रमांक एम. एच.- २६ झेड- २००७ व कार क्रमांक एम.एच. १२ एनई ३८०३ यांच्यात समोरा समोर अपघाताची घटना घडली.
अपघात एवढा भिषण होता की, मोटर सायकल वरील एका महिलेसह पुरुष जागीर ठार झाले. यामध्ये एक तीन वर्षीय चिमुकली जखमी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक कानगुले, वाहतुकचे कदम, दिलीप नाईक, घुगे, गडदे, गर्जे, गिरी आदींनी तात्काळ धाव घेतली. (Car-Bike Accident) दोन्ही मृतदेह औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
दोन्ही मयत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील रहिवासी!
कार व मोटर सायकल अपघातात ठार (Car-Bike Accident) झालेले दोघेही नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील बरखतपुरा भागातील रहिवासी आहेत. ज्यामध्ये शेख ऐजाज शेख रहिम (२८), नुरजा एजाज शेख (२६) हे दोघेही ठार झाले असून दोन वर्षीय चिमुकली अनाबिया बेगम हि जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.