परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील घटना गुन्हा दाखल!
परभणी (Car-Bike Accident) : परभणीतील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे भरधाव वेगातील कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका विरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यात (Sonpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमीवर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार!
सोनपेठहून परभणीकडे जाणारी एम.एच. 22 यु. 7859 या क्रमांकाची कार आणि एम.एच. 34 व्हि.4419 या दुचाकीत समोरा समोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार रिजवान दादामियाँ शेख वय 60 वर्ष, यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले नासीर रिजवान शेख गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख इरफान यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी व्यंकट रामराव पुंडकर रा. साखला प्लॉट परभणी याच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. तपास सपोनि. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अजय किरकन करत आहेत.