तरुणीला मारहाण करीत धिंड काढल्याचे प्रकरण
भंडारा (Kothurna Crime News) : भंडारा तालुक्यातील पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत येत असलेल्या कोथुर्णा येथे दि.१२ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान खातकुड्यावर केरकचरा फेकण्याच्या वादातून गावातीलच दिनेश बोंद्रे नामक व्यक्तिने केरकचरा फेकण्यास गेलेल्या तरुणीला अश्लिल भाषेत शिविगाळ करुन मारहाण करुन तिच्या घरापर्यंत धिंड काढल्याची घटना उघडकीस आली होती. या (Kothurna Crime News) घटनेतील गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यास वरठी पोलीस टाळाटाळ करीत होते. पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. दैनिक देशोन्नतीने घटनेचे गांभिर्य ओळखून ‘मारहाण करीत तरुणीची काढली धिंड’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. अखेर पोलीस प्रशासनाने वृत्ताची दखल घेत दिनेश बोंद्रे नामक गुन्हेगारावर वरठी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कोथुर्णा येथील पीडित तरुणी पूनम कांबळे (२०) ही घटनेच्या वेळी घरचा केरकचरा फेकण्यासाठी खातकुड्यावर गेली होती. त्यावेळी आरोपी दिनेश बोंद्रे याने खत फेकण्याच्या कारणावरुन तिला शिविगाळ करुन भांडण केले. (Kothurna Crime News) अश्लिल शब्दात शिविगाळ करुन तिला मारहाण करीत तिच्या घरापर्यंत धिंड काढली. पीडितीने आरडाओरड करताच तिची आई व बहिण यांनी त्याच्या मारहाणीच्या तावडीतून सुटका करण्याच्या प्रयत्नात त्यांना सुद्धा मारहाण करुन मानव जातीला काळीमा फासणार्या अश्लिल शब्दात बोलून मानहानी केली. जखमी पूनम हिचेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र वरठी पोलिसांकडून गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. (Kothurna Crime News) सदर प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात होते. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाने याची दखल घेत गुन्हेगार दिनेश बोंद्रे याचे विरुद्ध कलम ११८(१), ३५२ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरठी पोलिसांकडून घटनेची चौकशी थातूरमातूर करुन खर्या गुन्हेगाराला अजूनही वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा (Kothurna Crime News) आरोप जखमी पीडितेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन पीडितेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी जखमी पीडितेच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.