Arni :- आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील मोमीन परा परिसरात गोवंश मास विक्री करणार्या दोन जणांविरुद्ध आर्णी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल (Head Constable) नितीन मास्टर हे वॉरंट तमिल कामी गेले असता यातील आरोपी जुम्मा खा उस्मान खान वय ६७, साबीर खा जुम्मा खा वय ४० दोघेही राहणार मोमीनपुरा हे मास विक्री करिता मासाचे तुकडे करीत असताना दिसले.
तीन लोखंडी सूरी एक कुराड किंमत ६०० रुपये असा एकूण ७६०० रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष मिळून आला
त्यावरून हे मास कशाचे आहे याबाबत त्यानी विचारणा केली असता सदरचे मास गोवंश बैलाचे असल्याचे सांगितले. मासाची मोजणी केली असता गोवंश मास ३० किलो वजन प्रति किलो दोनशे रुपये प्रमाणे ६ हजार रुपये चे गोवंश मास (beef mass) विक्री करिता वापरण्यात येणारे साहित्य वजन काटा अंदाजी किंमत १ हजार रुपये व मांस कापण्याकरिता तीन लोखंडी सूरी एक कुराड किंमत ६०० रुपये असा एकूण ७६०० रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष मिळून आला. अशा पो.हे.का च्या लेखी फिर्याद वरून वरील दोन जणाविरुद्ध कलम ५ (क), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ३२५, ३ (५) भा.न्या.स. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.