Pusad crime :- तालुक्यातील आदिवासी समाजात दिग्रस येथील घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे. १९ सप्टेंबर रोजी आदिवासी समाजातील महिलांना जाणीवपूर्वक जाती ला उद्देशून अश्लील (abusing)वर्तन केल्याचे विडिओ समाज माध्यमात फिरत होते. घटनेचा पडसाद पुसद तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर उमटले.
डॉ.आरती फुपाटे यांचे नेतृत्वात महिलांचा पो. स्टे.वर मोर्चा
पुसद तालुक्यातील आदिवासी समाजातील शेकडो संतप्त महिलांचा डॉ. आरती फुपाटे यांच्या नेतृत्वात पुसद शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा धडकला. महिलांनी संबंधित आरोपींवर तात्काळ अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची निवेदन देऊन मागणी केली. तसे न झाल्यास समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा डॉ आरती फुपाटे यांनी दिला. मोर्चात वर्षा वैद्य, शिल्पा भुरके, दुर्गा टारफे, मंजुषा बोंबले, छायाबाई पांडे, सुनीता मळघणे, शीतल ढगे, राधा हजारे, कमल इंगळे, निंबा भरकाडे, वर्षा उगले, अर्चना उगले, सुनिता पांडे, आशा भिसे, वंदना उगले, शालिनी पांडे, पंचफुला भुजाडे, अन्नपूर्णा काळे, लक्ष्मी पांडे, शकुंतला भिसे, लक्ष्मी बळी, मिराबाई काळे, कांता वायकुळे, कांताबाई बळी, मीरा बोडखे, अंकिता झळके, कविता वडगे, महानंदा मारकड, सुनिता जंगले, वर्षा दुम्हारे, विजया इंगळे, विभा भोरकाडे, कमल इंगळे, राधा हजारे, राधा इंगळे, सु. डी. खोकले, माला इंगळे, पुष्पा कुरुडे, रेखा टारफे, वर्षा डाखोरे, शीला ब्राह्मणकर, सुनिता वाडगे, कल्पना तितरे, मीनाक्षी चांदोडे, शितल कर्हाळे, शारदा सांडवकर, सौ. शा. ना. इंगळे, सुरा उघडे, नंदा उघडे, कमल उघडे, दुर्गा चिरंगे, संतोषी पिंपळे, सुचिता गायकवाड, सीमा वैद्य, कौशल्या ढाकरे, ज्योत्स्ना लोखंडे, सपना लांबटोंगळे, मनीषा दुम्हारे, ज्योती बेले, किरण हगवणे, जया वाघमारे, रेणुका कुरुडे, पूनम बोंबले आदी शेकडो महिला सहभागी होत्या.