Pandharkawda :- नाल्यात करंट सोडुन मासे पकडणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतले असुन त्याच करंटच्या वायरचा शॉक लागुन व्यक्तीचा नाल्यातच मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील वाघोली गाव शिवारातील नाल्यात आज १७ रोजी उघडकीस सकाळी उघडकीस आली.
विजय भाउराव नान्ने ३८ रा वाघोली असे मृतकचे नाव आहे. मृतक विजय हा १६ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घरुन नाल्यात मासे पकडण्याकरीता गेला होता. तो नाल्यात विजेचा करंट ताराव्दारे सोडुन त्यातील मासे मारुन पकडत होता. १६ रोजी सुध्दा त्याने नाल्यात करंट सोडला. मात्र त्याच करंटच्या वायरचा त्याला जबर शॉक (Shock) बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु (Death)झाला.