हिंगोली बसस्थानकातील प्रकार!
हिंगोली (Chain Snatching) : शहरातील बसस्थानकाच्या स्वच्छता गृहात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जिंतूर येथील 49 वर्षीय महिला गेली असता एका चोरट्याने तिचा पाठलाग करून गळा दाबुन सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडल्याने हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला.
अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल!
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिंतूर येथील नारायण नगर वैâरी प्लॉट भागातील सुनिता भगवानराव घुगे हि महिला आपल्या मुलीसह अमरावती येथून बसने हिंगोलीला आल्या होत्या. 8 ऑगस्ट रोजी हिंगोलीतील बसस्थानकाच्या स्वच्छतागृहात त्या गेल्या असता एका अज्ञात चोरट्याने त्यांचा पाठलाग करून स्वच्छता गृहात जावून त्यांचा गळा दाबल्याने सुनिता घाबसून गेल्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅमची 21 हजार रुपयाची पोत चोरट्याने ओढून पलायन केले. या प्रकरणामुळे घाबरलेल्या सुनिता घुगे यांनी तात्काळ हिंगोली शहर पोलिसात धाव घेवून रितसर तक्रार दिली. याचवेळी पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, गणेश वाबळे, संजय मार्वे यांच्या पथकाने बसस्थानकात जावून चोरट्याचा (Thief) शोध घेतला. परंतु चोरट्याचा शोध लागला नसल्याने हिंगोली शहर पोलिसात (Hingoli City Police) अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत.
बसस्थानकात सीसीटिव्ही लावण्याकडे आगाराचे दुर्लक्ष!
हिंगोली जिल्हास्तरीय शहर असलेल्या बसस्थानकात प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. विशेष म्हणजे बसस्थानकात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने या ठिकाणी अनेक वेळा महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील रक्कम, तसेच पुरुषांचे मोबाईल यासह ऐवज चोरीच्या अनेक घटना यापुर्वी घडल्या आहेत. या ठिकाणी सीसीटिव्ही (CCTV) बसविण्याकडे हिंगोली आगाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटिव्ही बसविले तरच अशा घटनांवर आळा येवू शकतो.