कोरपना (Chandrapur) :- तालुक्यातील अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहे तालुक्यात अंतोदय योजनेच्या ७४२४ व अन्नसुरक्षा योजनेच्या १५४८६ शिधापत्रिका नागरिकांना देण्यात आल्या आहे. शासनाच्या सूचनेनंतर या सर्व शिधापत्रिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिधापत्रिका (ration card) धारकांना तपासणी करीता विहित नमुन्यातील अर्ज भरून अर्जासोबत परिवाराचे आधार कार्ड (Aadhar Card), रहिवास पुरावा व उत्पन्न दाखला जोडून अर्ज रास्त भाव दुकानदाराकडे छाननी व तपासणी करिता द्यायचा आहे. यात उत्पन्न दाखला अत्यंत महत्त्वाचा असल्याने शिधापत्रिका धारकांची उत्पन्न दाखल्या काढण्याकरिता तलाठी कार्यालयामध्ये रीघ लागल्याचे दिसते तलाठी यांच्याकडून उत्पन्न दाखला घेतल्यानंतर सेतू केंद्रातून तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.
उत्पन्न दाखला घेतल्यानंतर सेतू केंद्रातून तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र घ्यावे
मोठ्या संख्येने शिधापत्रिकाधारक उत्पन्न दाखला काढत असल्याने अनेक सेतू केंद्र चालक उत्पन्न दाखल्या करिता ५०/- रुपये शुल्क घेण्याऐवजी १५०/- रुपये इतके शुल्क घेऊन नागरिकांची सर्रास लूट करीत आहे. १००/५० रुपया करिता तक्रार करायची झाल्यास तहसीलदार कोरपना यांच्याकडे जावे लागते. याकरिता जाण्या-येण्याचा खर्च २०० ते ३०० रुपये लागतो. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाही. प्रशासनाने उचित कारवाई करून नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी होत आहे.
जोगी सर्विसेस मधून नागरिकांची लूट
जोगी सर्विसेस या सेतू केंद्रात उत्पन्न दाखला काढण्याकरिता गेलो असता उत्पन्न दाखल्या करीता अनेकांकडून १५०/- रुपये प्रती उत्पन्न दाखला याप्रमाणे पैसे घेतले आहे आम्हा सर्वसामान्य नागरिकांना काय माहित शासकीय दर किती असतो आणि काय असतो १५०/- रुपये जोगी सर्विसेस या सेतू केंद्र चालकाने मागितले तेवढे पैसे आम्ही दिले असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर अनेक शिधापत्रिकाधारकांनी माहिती दिली