चंद्रपूर (Chandrapur) : रानडुकराची शिकार करण्यासाठी आलेला बिबट (Leopard) हा शेतीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारात अडकून जखमी झाल्याचे गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना (Forester) दिसताच त्यांनी बिबट्याला बेशुध्द केले व रेस्क्यू (Rescue) करुन तारेतून त्याची सुटका केली. त्यानंतर वैद्यकीय उपचाराकरिता वन्यजीव उपचार केंद्रात (Wildlife Treatment Center) नेण्यात आले. ही घटना 23 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास घडली.
बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे वनात गस्ती वर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 572 लगत असलेल्या शेतात रानडुक्कर (Wild Boar) ची शिकार करतवेळी बिबट (नर) शेतीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या सोलर कुंपनाच्या (Solar Fencing) तारात अडकला. त्यानंतर अति शिघ्र दल, बल्हारशाह व डॉ. कुंदन पोडचलावार, पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer), वन्यजीव उपचार केंद्र, ता. अ. व्या. प्र, चंद्रपुर यांनी सदर बिबट वन्यप्राण्यास बेशुध्द करून रेस्कूय करण्यात आले व त्यानंतर वैद्यकीय तपासणी करीत वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. सदर रेसक्यु मोहिम उपवनसंरक्षक, श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नरेश भोवरे यांचे मार्गदर्शनात वनरक्षक एस. पी. नन्नावरे, सुधीर बोकडे, बायोलॉजीस्ट नुर अली सय्यद, अति शिघ्र दल, बल्हारशाह पथक व रोपवन संरक्षण मजुर यांनी सदर बिबट वन्यप्राण्याची तारेतुन सुटका करण्यास मोलाची भुमीका बजावली.
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रातील घटना
बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांनी हैदोस घातला असून त्यांच्यामुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे परंतू मनुष्य व पाळीव जनावरांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामूळेत्यांना जेरबंद करणे गरजेचे झाले आहे.




