ब्रम्हपुरी (Chandrapur):- दि. ६/८/२०२४ रोजी रात्री दरम्यान फिर्यादी विनोद बापूराव दुपारे, वय ४३ वर्ष राहणार शिवाजी चौक, ब्रह्मपूरी यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एम.एच. ३४ बीटी ३१७४ ही अज्ञात चोराने चोरून नेलेबाबतची तक्रार दिल्याने पोस्टे ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक ३९४/२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा (Crime)नोंद करण्यात आला होता.
आरोपीकडून एकूण दोन मोटरसायकल जप्त
त्यावरून ब्रह्मपुरी पोलीसानी तपास केला असता ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील आरोपी नामे गोलू वासुदेव भांडेकर, (२८) रा. तांडूरवार चौक आरमोरी, होमराज रामकृष्ण गावतुरे, (३०) रा. आष्टा ता. आरमोरी, संतोष महादेव सोनटक्के, (३९) रा. आष्टा ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्यात चोरी गेलेली मोटरसायकल (Two wheeler) स्प्लेंडर प्लस एम एच ३४ बीटी ३१७४ किं. ४०००० रुपये चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून तपासात पो स्टे (Police station) ब्रह्मपुरी अपराध क्रमांक ३८०/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्रो- एम.एच. ३४ एके ९९४० कि. २०,००० रुपये मिळून आल्याने सदर आरोपीकडून एकूण दोन मोटरसायकल किंमत ६०,०००/-रुपयाचा माल हस्तगत करून पोलीस स्टेशन मधील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण, पोहवा योगेश शिवणकर, नापोका मुकेश गजबे, पो अ संदेश देवगडे, विजय मैद यांनी केली.