कोरपना (Chandrapur) :- आधार केंद्रावर गैर प्रकाराच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नंतर केंद्र शासनाने (Central Govt) नियमात बदल करत खाजगी जागेवरील सर्व आधार केंद्र रद्द करू पोस्ट ऑफिस, बँक(Post office), जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, शासकीय महाविद्यालये, तलाठी कार्यालय,ग्रामपंचायती अशा ठिकाणी आधार नोंदणी केंद्र देण्यात आले गुगलवर सर्च केल्यास नांदा येथे प्रभू रामचंद्र विद्यालयात आधार नोंदणी केंद्र असल्याचे दर्शविते मात्र प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा येथे कुठलेही आधार नोंदणी केंद्र कधीच सुरू करण्यात आले नसल्याची माहिती स्थानिक नागरिक देत होते.
परस्पर स्थळ बदली प्रकरण, जिल्हाधिकारी यांच्या कारवाईकडे लक्ष
नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्याललयतील आधार केंद्र कसे काय गहाळ झाले, की शासनाची कुठलीही परवानगी न घेता परस्पर स्थळ बदली करण्यात आली याबाबत शंकाकुशकांना आता पेव फुटले होते याबाबत तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सिसिटीव्ही कॅमेरासह (CCTV camera) चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती कोरपना तहसीलदार यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती असून कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
१२ वी ची परीक्षा असल्याने २५ तारखेपर्यंत आधार केंद्र बंद
प्रशांत जोगी नामक मायक्रोवर्ल्ड कॉम्पुटर सेंटर नांदाफाटा येथे महाऑनलाइन केंद्र, व्हीएलई सेतू केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र (Aadhaar Enrollment Centre) सर्व एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून सोयी सुविधांचा अभाव आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विविध दाखल्याचे दर फलक लागलेले नसल्याने नागरिकांकडून आगाऊ रक्कम वसूल केली जात होती केंद्र शासनाच्या नियम डावलून आधार नोंदणी केंद्र स्थळ बदली करून इतर ठिकाणी सुरु केल्याने चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आल्याने याबाबतचा धसका घेत सेतू केंद्र चालकानी आधार नोंदनी करिता त्यांच्या खाजगी दुकानात गेलेल्या नागरिकांना १२ वी ची परीक्षा असल्याने २५ तारखेपर्यंत आधार केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती देत ग्राहकांना सुविधा दिली नव्हती मात्र मागील अनेक वर्षात प्रभू रामचंद्र विद्यालयात कधीही कुणालाही सुरु न दिसलेले आधार सेवा केंद्र सुरु केले असून आगाऊ रक्कम घेऊन आणखी ग्राहकांची लूटमार सुरु असल्याची ओरड नागरीक करीत असून जिल्हाधिकारी यांच्या कारवाई कडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत