Chandrapur :- तालुक्यातील माढेळी गावातील वडगाव रोड परिसरात ७ ऑगस्ट रोजी सुरू असलेल्या अवैध जुगार (Illegal gambling) अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून १२ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६ लाख ६५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमालासह जुगार खेळणार्या इसमांना अटक केली असून, सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जण अटकेत ६.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे यांना गोपनीय माहिती मिळाली की माढेळी गावात वडगाव रस्त्यालगत काही व्यक्ती ५२ ताशांच्या सहाय्याने रोख पैशावर जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
दरम्यान, ७ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.३० ते २ वाजेदरम्यान माढेळी गावातील मटन मार्केटजवळ छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ आरोपींना अटक केले. त्यात निलेश रामदास केराम (३७), साहिल मोहम्मद शेख (२५), विलास निलकंठ गडमाडे (४०), प्रविण बाबाराव भगत (३२), महेश कृपाळ जोगी (२६), अंकुश आनंदराव कोंडेवार (२७), केवलराम बबनराव खापने (४४), जगन्नाथ सुनील धात्रक (२४), राजू महादेव नागपुरे (३५), कुनाल दिनकर हांडे (२८), राहुल अशोक करपे (२७), वैभव रामदास भदनखेडे (२७) सर्व रा. माढेळी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे.