बँकेच्या ऑनलाईन प्रक्रीयेवर सायबर हल्ला!
चंद्रपूर/भंडारा (Chandrapur) : येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (Cooperative Bank) ऑनलाईन प्रक्रीयेवर सायबर हल्ला करीत अज्ञात व्यक्तीने बँकेतील तब्बल 3 कोटी 70 लाख 64 हजार 742 रुपयावर डल्ला मारल्याने आता मध्यवर्ती बँक असुरक्षीत झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडेच बँकेकडून राबविण्यात आलेल्या नोकरभरतीदरम्यान, परिक्षेच्या पहील्याच दिवशी पेपर सुरू असतांना, सायबर हल्ला (Cyber Attack) करून पेपर हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पेपरच रद्द करण्याची नामुष्की बँकेच्या व्यवस्थापनावर आली होती, हे येथ उल्लेखनीय.
बँकेतील 3 कोटी 70 लाख 64 हजाराची रक्कम गहाळ!
आता तर चक्क बँकेतील रक्कमेवर सायबर हल्ला करीत चोरट्यांनी बँकेला चुना लावल्याने हे प्रकरण पोलिसात गेले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑनलाईन प्रक्रियेत प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने 3 कोटी 70 लाख 64 हजार 742 रुपयाने बँकेची फसवणूक करण्यात आल्याचे 7 व 10 फेब्रुवारी रोजी निदर्शनास आले. यावरून बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापकाने (Information and Technology Manager) 11 फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार नोंदविली.
पोलिसात तक्रारीनंतर 1 कोटी 32 लाख वाचविण्यात यश!
यावरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायदाचे (Information and Technology Act) विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्पूर्वी सदर प्रकरणी संबंधीत बँक अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पो. स्टे. ला माहिती दिल्यानंतर दि. 10 फेब्रुवारी रोजी नॅशनल सायबर गुन्हे रिपोर्टीग पोर्टलवर (Reporting Portal) त्यांची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर एकुण 33 ट्रॉन्झेक्शनवर फ्रिज लावण्यात आल्याने बँकेत 60 लाख 64 हजार 582/- रुपये परत जमा झाले. त्यानंतर 71 लाख 34 हजार 737/- रुपये विविध बँक अकॉऊन्टला होल्ड झाले आहे. अद्याप पावेतो एकुण 1 कोटी 31 लाख 99 हजार 319/- रुपये वाचविण्यास चंद्रपूर पोलीसांना यश आला आहे. उर्वरीत रक्कमेबाबत संबंधीत बँकशी पत्रव्यवहार (Bank Correspondence) करुन बँकेची आयटी टिम, सायबर टिम आणि पोस्टे रामनगर तपास पथक गुन्हयाचा सखोल व तांत्रीक तपास (Technical Investigation) करीत आहे.




