राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन!
सालेकसा (Chemical Fertilizers) : खरीप हंगामाला (Kharif Season) सुरूवात झाली आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असून, रोवणीचे कामे वेगाने सुरू आहेत. त्यातच शासनाने शेतकर्यांना अडचण होवू नये, याकरीता मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध करून दिला आहे. परंतु, कृषी केंद्र संचालक आपल्या मनमर्जीने कृत्रिम टंचाई निर्माण करून खताचा काळाबाजार (Black Market Fertilizer) करीत आहेत. तर अनेक ठिकाणी वाढीव दराने खत देवून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. या प्रकाराची दखल घेवून खताचा काळाबाजार थांबवून कृषी केंद्रावर (Agricultural Centers) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी नायर यांना देण्यात आले आहे.
केंद्र संचालक अधिकचा नफा कमविण्याच्या नादात शेतकर्यांची लूट करीत आहेत!
खरीप हंगामात शेतकर्यांना खत टंचाई निर्माण होवू नये, याकरीता शासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुचनाही कृषी विभागाच्या वतीने कृषी केंद्र संचालकांना देण्यात आले आहे. परंतु, केंद्र संचालक अधिकचा नफा कमविण्याच्या नादात शेतकर्यांची लूट करीत आहेत. केंद्रावर खत घेण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना खत उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत आहे. यावर विचारणा केली असता पुरवठा करण्यात आला नाही, असे सांगितले जाते. खत उपलब्ध असल्यास निर्धारित किंमतीपेक्षा अधिक दराने दिला जातो. वाढलेल्या किमती विषयी विचारणा केल्यास अधिकच्या दरानेच खरेदी केल्याचे तसेच खतसाठा कमी असल्याचे सांगितले जाते. 266 किमतीचा खत 300-350 च्या दरात विक्री केला जाता. 20-20-0-13 हा खत 1450 ते 1500 च्या वाढीव किंमतीने विकले जात आहे. खतविक्रीच्या माध्यमातून शेतकर्यांची सर्रास लुट सुरू आहे. असे असूनही जिल्ह्यातील कृषी विभाग (Department of Agriculture) झोपेचे सोंग करीत आहेत. याकडे लक्ष देवून शेतकर्यांची फसवणूक व होणारी लूट त्वरित थांबविण्यात यावी, वाढीव दराने खत विक्री करणारे तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणार्या केंद्रावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांन निवेदन देण्यात आले आहे. शेतकर्याची लुट थांबविण्यात आली नाही. तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित!
शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष मनोज डोये, जिल्हा महासचिव विजय वाढई, तालुका युवक अध्यक्ष भिमेश पटले, तालुका युवक उपाध्यक्ष अजय शेंडे, ओबीसी आघाड़ी तालुका प्रमुख अनिरूद्ध मेश्राम, राजु फुंडे, शेतकरी गौरीशंकर बिसेन, रंजित जनबंधु ,अमित वैद्य यांच्यासह शेतकरी (Farmer) मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कृत्रिम टंचाई निर्माण करून लूट!
खताचा साठा व विक्रीला घेवून शासनाने (Government) सुचना केल्या आहेत. कोणत्याही शेतकर्यांची फसवणूक होवू नये, याकरीता कृषी विभागालाही सज्ज राहण्याचे सुचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही मोठ्या डिलरकडून खताचा कृत्रिम टंचाई निर्माण करून मागणीच्या तुलनेत कमी खत पुरवठा केला जात आहे. यातून होणारी भाववाढ शेतकर्यांच्या माथी मारली जात आहे. या प्रकाराने खत कंपन्य्य व मोठे डीलर संगनमताने शेतकर्यांची लूट करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील खत मध्यप्रदेश, छत्तीसगडला पाठविला जातो, असाही आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे.