मुंबई () : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
🔸CM Devendra Fadnavis at the oath ceremony presided by Governor CP Radhakrishnan. CM Devendra Fadnavis congratulated MLA Chhagan Bhujbal on being sworn in as Minister.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आमदार छगन… pic.twitter.com/Hs6c1f6FmM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 20, 2025
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे कुटूंबीय यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.