महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करणाऱ्या संवेदनाहीन सरकारचाही जाहीर निषेध
निलंगा (Chhatrapati Shivaji Maharaj) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या एक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होऊन ही अद्याप सरकारने हा प्रश्न मिटवला नाही म्हणून व सरकारच्या निष्काळजीपणामुळे व गांभिर्य नसल्याने मालवण येथील (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून तो आठ महिन्यात कोसळला.
ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगत निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षाच्या निषेधाचे बॅनर फलक लावून श्राद्ध घालून सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी (Sakal Maratha Samaj) मराठा समाजाच्या बांधवांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्षश्राद्ध विधी घालण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करणाऱ्या या संवेदनाहीन सरकारचाही जाहीर निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत सकल मराठा बांधवांनी पदयात्रा काढून “मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणाबाजी करत सर्व पक्षाचे निषेध करून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, व मालवण येथील घटनेतील दोषींवर कारवाई करावी अशा मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक (Sakal Maratha Samaj) मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.