Chief Minister Devendra Fadnavis :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर बॉम्बने हल्ला (Bomb attack) करण्याची धमकी देणारा व्हॉट्सॲप मेसेज (WhatsApp message) आला आहे. या व्हॉट्सॲप मेसेजने राज्यात खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांना धमकी मिळाली
मुंबई वाहतूक पोलिसांना हा धमकीचा मेसेज व्हॉट्सॲपवर मिळाला आहे. वरळी पोलिसांनी धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सॲपवर हा धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले. काल दुपारी हा मेसेज मिळाल्यानंतर पोलीस तपास विभाग अलर्ट मोडवर आहे. मेसेज पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरची आहे, याचा तपास सुरू आहे.
पोलीस विभाग व्हॉट्सॲप मेसेजच्या ठिकाणाचा तपास करत आहे. व्हॉट्सॲप मेसेज पाकिस्तानमधील (Pakistan) कोणत्या ठिकाणाहून आला याचा तपास सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Ministry of Home Affairs) सुरक्षा विभागाला पाकिस्तानातून येणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हॉट्सॲप संदेश धमकी प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू केला आहे.