परभणी (Parbhani):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचार्यांची उपलब्धता करुन द्यावी, या मागणीचे निवेदन परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. महसूल विभागात(Department of Revenue) मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शासनाने वेळोवेळी काढलेल्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महसुलचे कर्मचारी व्यस्त आहेत. त्यात आता नवीन योजनेची भर पडली आहे. यामुळे दैनंदिन कामकाज(daily operations) करताना अडचणी येत आहेत. योजना पूर्ण क्षमतेने सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.
प्रत्येक तालुक्यात कर्मचारी द्यावेत
योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात एक नायब तहसिलदार, दोन अव्वल कारकुन, दोन महसूल सहाय्यक, एक उप लेखापाल ही पदे मंजुर करुन त्यांच्या मार्फत योजना कार्यान्वीत करावी. योजनेचे कामकाज सुरू होण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतणिस आदी अधिकार्यांची नियुक्ती करावी. जो पर्यंत कर्मचारी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत योजनेचे कामकाज नाकारत असल्याबाबत निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. निवेदनावर नानासाहेब भेंडेकर, प्रकाश गोरे, पंचशिलकरुणा बगाटे, विठ्ठल मोरे, वैजनाथ फड यांच्या स्वाक्षर्या (signatures) आहेत.