‘जलतारा’मुळे जलक्रांती : वाशिम जिल्ह्याची ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंद
रिसोड (Washim Jaltara Yojana) : राज्याचे मुख्यमंत्री व सिंचन विकासाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ‘जलतारा योजना’ हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरतो आहे. वाशिम जिल्ह्यातही या (Washim Jaltara Yojana) योजनेला मोठ्या प्रमाणात यश लाभले असून जिल्ह्याचे नाव थेट ग्रीनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदले गेले आहे.
भूगर्भातील जलपातळी वाढवून दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या उद्देशाने राज्यभर ही (Washim Jaltara Yojana) योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित झाली. जलतारा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सामाजिक संस्था, पत्रकार, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, राजकीय संघटना तसेच महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकात्मतेने परिश्रम घेतले.
‘जलतारा’ उपक्रमात आर्ट ऑफ लिविंग, पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायती, सरपंच-उपसरपंच, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. (Washim Jaltara Yojana) योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची नवी दिशा मिळाली असून पाणीटंचाईवर प्रभावी मात करता आली आहे. वाशिम जिल्ह्याचे नाव थेट ग्रीनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदले गेले आहे.
या अभूतपूर्व (Washim Jaltara Yojana) कामगिरीबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व उत्तर भारतीय प्रदेश सचिव लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनासह सर्व सहभागी घटकांचे कौतूक केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम व वाशिम जिल्हा उप जिल्हाधिकारी विश्वनाथ जी घुगे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सत्कारही केला जाणार असल्याचे लखनसिंह ठाकूर म्हणाले.