हिंगोली (Hingoli inspection) : शहरातील रस्त्यावर उघड्यावर मासविक्री केली जात असल्याने ११ दुकानांना सील ठोकण्यात आलेले आहेत. या दुकानांची पाहणी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी रविवारी केली.
हिंगोली शहरामध्ये उघड्यावर मास विक्री केली जात असल्याने नगर पालिका, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्त मोहीमेव्दारे ११ दुकानांना सील ठोकले होते. हे सील ठोकल्या नंतर कोणतेही मास विक्रेते सील केलेल्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी (Hingoli inspection) व्यवसाय करीत आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्याकरीता १२ मे रोजी मुख्याधिकारी अरविंद मुंडे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश्री सावंत यांनी पाहणी केली. यावेळी उपमुख्याधिकारी सचिन पवार, नगर अभियंता प्रतिक नाईक, सहाय्यक नगर रचनाकार किशोर काकडे, संदिप घुगे, कैलास थिट्टे, दिनेश वर्मा, कुणाल कांबळे आदींची उपस्थिती होती.