शेतात जावून केले नुकसानीचे स्थळ निरीक्षण
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Naib Tehsildar) : गेल्या तीन दिवसा पासून परतीच्या पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले तसेच शेत रस्ते गटारात की गटारात रस्ते अशी परिस्थीती निर्माण झाली. परंतु (Chikhali Naib Tehsildar) नायब तहसीलदार जाधव मॅडम हया महिला अधिकारी आहेत तर , मंडळ अधिकारी केदार हे अंपग अधिकारी असल्याने त्यांनी शेतात वाहने जात नाहीत म्हणून त्यांनी एका शेतकऱ्याची बैलगाडी घेवून शेत रस्त्याचे व पिक नुकसानीचे स्थळ निरीक्षण केले.
परतीच्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसा पासून जिकडे तिकडे हाहाकार करून मोठे नुकसान करूण टाकले त्यात अंढेरा मंडळ मध्ये येणाऱ्या ८ ते १० गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले तसेच शेत रस्तेही खराब झाले. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी तहसिलदार यांनी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना आदेश दिले . त्यामुळे महिला अधिकारी असलेल्या (Chikhali Naib Tehsildar) नायब तहसीलदार जाधव मॅडम, अंपग असलेले मंडळ अधिकारी पी टी केदार यांची वाहने शेतात जाणे शक्य नव्हती . परंतु शेतात जावून नुकसानीचे स्थळ निरिक्षण करणे बंधनकारक आहे त्यामुळे मंडळ अधिकारी यांनी गावातील एका शेतकऱ्याची बैलगाडी घेतली आणि स्वत: हा अधिकारी व कर्मचाऱ्यांना गाडी मध्ये बसून शेतात शेतात जावून नुकसानीचे स्थळ निरीक्षण पंचनामे केले. यावेळी शेतात (Chikhali Naib Tehsildar) नायब तहसीलदार जाधव मॅडम, मंडळ अधिकारी केदार, गरकळ साहेब खांडेभराड साहेब तथा शेतकरी उपस्थित होते.