रिसोड (Children Playing Equipment) : लहान मुलांची खेळणी व युवकांना व महिलांसाठी लावण्यात आलेले व्यायामासाठी साधने ही अत्यंत चुकीच्या ठिकाणी व धोकादायक ठिकाणी लावण्यात आलेली आहे. कारण ही सर्व साधने महावितरणच्या विद्युत डीपीच्या जवळ लावण्यात आलेल्या जी अत्यंत धोक्यात आहे व या ठिकाणी जीवित्वास धोका निर्माण होऊ शकतो. सदर ठिकाणी लावण्यात आलेली सर्व सामग्री हटविण्यात यावी अशी मागणी पंकज सुधाकर पोहरकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांना दिनांक 2 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिवाजी नगर वार्डामध्ये सार्वजनिक जागेवर खुल्या जागेत लहान मुलांना खेळण्यासाठी सामग्री लावण्यात आली आहे व जिथे सामग्री लावण्यात आली आहे. तेथे विद्युत महावितरण ची डि.पी. तेथेच असुन सर्व डी.पी. उघडी आहे. त्यामुळे लहान बालक खेळतांनी केव्हाही त्या डी.पी. ला स्पर्श करु शकतात. ज्यामुळे त्यांच्या जिवीत्वास धोका निर्माण झाला आहे.
आपण कोणतीही शहनिशा न करता परवानगी दिली आहे. वरी लहान मुलांसोबत काही अनुचीत प्रकार घडल्यास यांचा जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी आपण काही अनुचीत प्रकार घडण्याअगोदर परवानगी रद्द करावी व सामग्री तेथुन हटविण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल. असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
सदर साधने ही जिल्हा क्रीडा विभागा कडून लावण्यात आलेली आहे या संदर्भात नगर परिषदेला निवेदन प्राप्त झाला असून सदर माहिती अहवाल पुढे पाठवण्यात आलेला आहे सदर विषयाची गांभीर्याने दखल घेतली असून लवकरच सदर साधने हटवण्याचे काम करण्यात येईल.
-सतीश शेवदा, मुख्याधिकारी रिसोड