मोजण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांना लागले पाच तास
रिसोड (Electricity Bill) : रिसोड शहर व तालुक्यात महावितरण कडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. यांतर्गत घरोघरी, दुकाने, आस्थापने, औद्योगिक यांच्याकडून विज बिल वसुली केली जात आहे. कोणी ऑनलाईन तर कोणी रोख रकमेच्या स्वरूपाने आपला विज बिल भरणा करत आहेत. मात्र या दरम्यान दी.13 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता रिसोड शहरातील एका व्यापारी वीज ग्राहकाने (Electricity Bill) महावितरणच्या विज बिल वसुली कर्मचाऱ्यांना 100 नव्हे 200 नव्हे 500 नव्हे तर चक्क 7 हजार 160 रुपयाची 1 व 2 रुपयाची चिल्लर नाणी देऊन टाकली.
सदर चिल्लर नाणींचा वजन 40 किलो असून विज बिल भरणा केलेल्या त्या ग्राहकाकडून ती चिल्लर णांनी दुचाकीने एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महावितरण कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी आणली. यावेळी (Electricity Bill) कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी सदर नाणी 3 कर्मचाऱ्यांनी मोजण्यास सुरुवात केली तर त्यांना सदर 7160 रुपयाची नाणी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना 5 तासाचा वेळ लागला.
सदर नाणि मोजताना तीनही कर्मचाऱ्यांना थंडीतही चांगलाच घाम फुटला होता. विज बिल भरण्यासाठी दिलेले नाणी चलनात असल्याकारणाने महावितरण कर्मचाऱ्यांना संबंधित ग्राहकाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मात्र देऊ शकले नाही. किंवा सदर नानणी स्वीकारण्यास नकारही देता आला नाही. सदर चिल्लर नाणी मोजण्याचे काम महावितरण कार्यालयातील रोखपाल प्रशांत थोटे, लाईनमेन उद्धव गजभार,तथा कंत्राटी कामगार अतुल थेर यांनी केले.