परभणी (Parbhani) :- येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू (Death) प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आली आहे. बुधवार २६ मार्च रोजी सीआयडीच्या पथकाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची भेट घेतली अधिक चौकशी करून लवकरच अहवाल शासनाकडे देण्याचे आश्वासन देखील पथकांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी शासन स्तरावर चौकशी चालू आहे.
आठ दिवसात चौकशी अहवाल तयार होणार
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये राज्य पातळीवरून हालचाली चालूच आहे. नुकताच मानव अधिकार आयोगाला न्यायालयीन चौकशीचा (Judicial inquiry) अहवाल देऊन पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे. जवळपास ७० पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची नावे यामध्ये आहेत. तसेच विधान भवनामध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर आवाज उचलला. बुधवारी सीआयडीच्या पथकाने परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. सोमनाथची आई व भाऊ यांच्याशी बोलून तपासामध्ये अधिक माहिती घेतली असल्याची समजते. खूप वेळ चर्चा झाल्यानंतर तपासी अधिकारी यांनी लवकरच या प्रकरणाचा अहवाल शासनाकडे देऊ असे आश्वासन कुटुंबाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कुटुंबाच्या वतीने अधिकार्यांना सर्वकाही आपल्या शासनाच्या हातात असताना अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सीआयडी (CID) कडून मात्र तपास लवकरच पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.