भिसे वाघोलीच्या भगतसिंग विद्यालयाच्या 1973 च्या दहावी वर्गाचे स्नेहमिलन
लातूर (Classmates Gathering) : 1973 मध्ये दहावी शिक्षण घेऊन भिसे वाघोलीच्या (Bhagat Singh School) भगतसिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातून बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थी वर्ग मित्रांचा पुन्हा एकदा तब्बल 55 वर्षांनी मेळा जमला.
भगतसिंग माध्यमिक (Bhagat Singh School) आणि उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली (भिसे) येथून 1973 मध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण व व्यवसायामुळे हा वर्ग मित्रांचा मेळा (Classmates Gathering) आपापल्या कामात व्यस्त राहिला. अनेक वर्षापासून सर्वांनी एके ठिकाणी जमावे आणि मनसोक्त गप्पा माराव्यात, असा विचार होता. त्या अनुषंगाने दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुरुड येथे आम्ही एक छोटेसे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
यानिमित्ताने अनेक मित्र तब्बल 55 वर्षांनंतर एकमेकांना भेटले. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. (Classmates Gathering) व्यक्त होतांना कांहीजणांना गहिवरून आले. यात पुण्याचे शहाजी साखरे भिसे वाघोली चे सत्तार पटेल, मुरुडचे दामोदर पाखरे, भिसे वाघोली चे रशीद पठाण, भोसा येथील फकीर खोसे लातूरचे रामचंद्र अल्टे सत्यवान मादळे व बलभीम कदम, मुरुडचे बबन अंदुरे व व्यंकट खोसे, भिसे वाघोली चे विठ्ठलराव भिसे, सोलापूरचे विष्णु सारडा, माटेफळचे दिगंबर खोसे, पनवेलचे तुकाराम सुरवसे, पुण्याचे भारत भिसे, भिसे वाघोलीचे साहेबराव पाटील व गंगाधर शिंदे, हरिश्चंद्र भिसे यांचा समावेश होता.
या (Classmates Gathering) कार्यक्रमाला भगतसिंग विद्यालय (Bhagat Singh School) आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव सुर्यवंशी , मुरुड येथील समाजसेवक आणि मुरुड ग्रामपंचायतचे उपसरपंच नागटिळक बापु यांनी हजर राहून मनोगत व्यक्त केले आणि त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शहाजी साखरे यांनी केले. तर उपस्थित वर्गमित्रांच्या वतीने प्रमुख मार्गदर्शन सत्तार पटेल यांनी केले.
आठवणीत रमले मित्र…
अल्लड, अवखळ वयातील खोडकरपणा, केलेल्या चुका, शिक्षकांचा सोसलेला राग, परीक्षेत मिळालेले यशापयश तसेच कांही प्रसंगी मिळालेला छडीचा मार अशा आंबटगोड आठवणीत शिरतांना हे सत्तरीतील तरूण खाकी हाफ पॅन्टच्या विश्वात कधी रमले, हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. या (Classmates Gathering) मित्रांपैकी शेती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, राजकारण भक्ती संप्रदाय अशा विविध क्षेत्रात आपले योगदान देऊन आता निवृत्त झाले आहेत किंवा त्या मार्गावर आहेत.




