नागरिकांच्या घरात शिरले पाणी!
कळमनुरी (Cloudburst) : कळमनुरी शहरासह तालुकाभरात दि.२६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाने कहर केला असून कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर कळमनुरी शहरात अनेक भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत!
कळमनुरी शहरासह तालुकाभरात दि.२६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाने कहर केला असून कळमनुरी तालुक्यातील कोंढुर,डिग्रस, चिंचोर्डी, डोंगरगाव पूल, वाई,तरोडा, खापरखेडा, वाकोडी या सह तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटला असुन शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांची (Farmers) उरलीसुरली पिके वाया गेली आहे.तर कळमनुरी शहरातील बुडकी नाल्याला पूर आला असून शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते शहरातील बाजारपेठही ठप्प झाल्याची पहायला मिळाले.
पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने संसारउपयोगी साहित्यांचे नुकसान!
गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा मुळे मुख्य रस्त्याचे पाणी शिरले शहरात कळमनुरी शहरात मागील दोन दिवसापासून सतत मोठा पाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या (Citizens) घरात शिरल्याने नुकसान झाले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळमनुरी शहरात गेल्या दोन दिवसांपासून सतत मोठा पाऊस पडत असल्याने पाणी शहरात येत आहे कळमनुरी शहरात रस्त्याचे काम सुरू असून या कामाचे नियोजन न केल्याने गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे एमआयडीसीचे पाणी थेट शहरात आले असून नवीन बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या मराठवाडा टी हाऊस व नॅशनल मोटार दुकानात पावसाचे पाणी घुसल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे शहरातील रस्त्याचे चौपदरीकरण करणाऱ्या गुत्तेदाराने रस्त्याचे काम करताना रस्त्याच्या उतार शहराकडे केला रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यांचे कामे न करता काम आटोपते घेतले व रस्त्याचे पाणी काढण्यासाठी कोणतेही उपाययोजना न केल्याने शहरात नेहमीच पाणी शिरत असल्याने शहरवासीयांना त्रास होत असून दि.२६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मोठ्या पावसामुळे एमआयडीसी परिसरातील वाहत असलेले पाणी नवीन बस स्थानक परिसरात व नुरी मोहल्ला भागातील नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे: जीवककुमार कांबळे!
कळमनुरी शहरासह दि.२६ सप्टेंबर पासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून नागरिकांनी अति अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये तसेच जनावरांची योग्य व्यवस्था करावी प्रशासन पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी केले आहे.




 
			 
		

