मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत!
मानोरा (Cloudburst) : तालुकाभरात दि.२६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाने कहर केला असून मानोरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर पोहरादेवी येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आसोला ते पारवा मोहगव्हाण भोयणी मार्ग बंद!
शहरासह तालुकाभरात दि.२६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाने कहर केला असून तालुक्यातील पोहरादेवी , माहुली , भुली, गव्हा, आसोला बु., रोहना, भोयणी, मोहगव्हाण , हिवरा, शेंदुरजना, हातोली, आमदरी, कारपा यासह तालुक्यातील इतर गाव शिवारात शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची उरलीसुरली पिके वाया गेली आहे. तर शहराला लागूनच वाहणाऱ्या अरुणावती, पूस, खोराडी नदीला व गोखी, चाकुर , नाल्याला पूर आला आल्याने नागरिकांचे (Citizens) जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे!
शुक्रवारपासून पासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून नागरिकांनी अति अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये तसेच जनावरांची योग्य व्यवस्था करावी प्रशासन पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महसूल विभागाच्या (Revenue Division) वतीने करण्यात आले आहे.