बँक शाखाधिकारी याच्याशी केली चर्चा
मानोरा (CM Ladki Bahin Yojana) : शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत लाडकी बहिणीच्या (CM Ladki Bahin Yojana) होत असलेल्या अडचणींवर त्वरित उपाययोजना व्हावी, यासाठी दि. २१ ऑगस्ट रोजी भाजपाचे युवा ज्ञायक पाटणी हे आपल्या कार्यकर्त्यांसह बँक शाखेत पोहचून शाखाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच केवायसी साठी मनुष्यबळ वाढविण्याची विनंती केली असता यावेळी शाखाधिकारी यांनी त्यांची मागणी मान्य करत दोन ऑपरेटर वाढविण्याचे आश्वासन दिले.
लाडक्या बहिणीशी साधला संवाद
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) अंतर्गत हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर, मानोरा शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँकेत केवासी अपडेट करण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत होता. पैसे विड्रॉल करण्यासाठी बँक शाखेत मोठी गर्दी होत होती, आणि अनेक वर्षांपासून न वापरलेल्या खात्यांसाठी व्यवहार करताना अडचणी येत होत्या. या परिस्थितीत, शाखेत कार्यरत फक्त एकच ऑपरेटर असल्यामुळे सकाळी ६ वाजता पासून संध्याकाळ पर्यंत महिलांची मोठी रांग लागत होती. ही समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे ज्ञायक पाटणी यांनी बँकेचे मॅनेजर सोबत चर्चा केली आणि दोन अतिरिक्त ऑपरेटर नियुक्त करण्याची मागणी असता त्वरीत कार्यवाही झाली.
तीन दिवसांत एक ऑपरेटर वाढविण्यात आला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात केवासी प्रक्रियेला गती मिळाली आणि महिलांचा त्रास कमी झाला. पुढील आठवड्यात आणखी एक ऑपरेटर वाढविण्यात येणार आहे, ज्यामुळे बँकेचे काम आणखी जलद गतीने होणार आहे. पाटणी ज्यावेळी बँकेत पोहचले, तेव्हा महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. वेळेअभावी बँकेचे कर्मचारी महिलांचे केवासी अर्ज घेण्यास नकार देत होते पण ज्ञायक पाटणी यांनी बँक मॅनेजर यांना विनंती केली आणी त्यांनी महिलांनी आणलेले सगळे फॉर्म स्विकारले. याव्यतिरिक्त त्यांनी बँकेत उपस्थित असलेल्या महिलांची तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण केले. शाखेत उपस्थित महिलांनी त्यांच्या सकारात्मक हालचालींमुळे समाधान व्यक्त केले. यावेळी (CM Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणींना बँकेतील आवश्यक सेवा जलद मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होता.