बुलढाण्यात स्मारकांचे लोकार्पण शाही थाटात
बुलढाणा (CM Ladki Bahin Yojana) : महापुरुषांचे स्मारके ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात, त्या स्मारकांची निर्मिती करुन नतमस्तक होण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत.. बुलढाणा शहरात सर्वात जास्त महापुरुषांच्या पुतळ्यांची स्मारके तयार करुन आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेले कार्य कौतूकास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले. (CM Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेसाठी ३३ हजार कोटी आम्ही बाजूला काढून ठेवले असून, ही योजना कायम सुरू राहिल. दीड हजारांवर थांबवणार नाही, तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराचे दोन हजार, दोन हजाराचे अडीच हजार, अडीच हजाराचे तीन हजार होतील, असे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
आ. गायकवाडांवर कौतूकाचा वर्षाव
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिव-स्मारकासह विविध १८ स्मारकांचे लोकार्पण थाटात पार पडल्यानंतर, (CM Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसाराचा अतिविराट कार्यक्रम झाला. यावेळी लाडक्या बहिणींच्या प्रचंड गर्दीला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय कुटे, आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, आ.श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) , आ. आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, बुलढाणा येथे आलो की आपल्या घरी आल्यासारखे वाटते, यावेळी शहरात उभारण्यात आलेल्या स्मारकांच्या कामाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचे कौतूक केले. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हढा आनंद झाला नाही त्यापेक्षा आनंद (CM Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणींच्या चेहर्यावरील समाधान पाहून आनंद झाला. या योजनेला विरोधकांनी विरोध केला. काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी आमचे सरकार आल की योजना बंद करू असे विधान करुन लाडक्या बहिणींचा अपमान करतांना तुम्हाला जणाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, असे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
आ. संजय गायकवाड यांचे कौतूक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आ. संजय गायकवाड यांचे तोंड भरून कौतूक करीत एवढ्या मोठ्या संख्येत स्मारकांची उभारणी केल्याबद्दल त्यांनी आ. संजय गायकवाड यांना धन्यवाद देतो, असे म्हणत कामाबद्दल त्यांनी आ. गायकवाडांचे (Sanjay Gaikwad) अभिनंदन केले.
तर कमळ, धनुष्यबाण व घड्याळ दाबा..
लाडकी बहिण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरुच ठेवायची असेलतर आगामी विधानसभा निवडणुकीत कमळ, धनुष्यबाण व घड्याळा पुढचे बटन दाबण्याचे आवाहन अजितदादांनी केले. तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही अप्रत्यक्षपणे त्याच प्रकारचे वक्तव्य केले.