शहरातील बी रंगुनाथ हॉल येथे कर्मचार्यांना प्रशिक्षण
परभणी (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणी साठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणी करीता परभणी शहर महापालिकेंतर्गत २९ सहाय्यता वार्ड केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रावर कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीने त्यांच्याकडील प्राप्त अर्जांची छानणी करुन तात्पुरती यादी प्रसिध्द करणे त्यावर प्राप्त झालेल्या हरकती, आक्षेप यांचे निराकरण करुन तात्पुरती सुधारीत पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम मान्यतेसाठी सादर करावयाची आहे. शहर मनपा अंतर्गत २९ सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रभाग समिती अ.ब.क. अंतर्गत ही केंद्र बनविण्यात आली आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य वर्धिणी केंद्र या ठिकाणी केंद्र करण्यात आले आहे. सदर सेवा अर्ज निशुल्क आहे. नागरीकांनी जवळच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर महापालिकेतर्पेâ करण्यात आले आहे. (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेता मनपाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीसाठी गुरुवार ११ जुलै रोजी बी. रघुनाथ सभागृहात कर्मचार्यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी आयुक्त तृप्ती सांडभारे, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते, मिलिंद वाघमारे, विद्या दानेकर, इख्तीयार पठाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचार्यांची उपस्थिती होती.