मराठवाड्यात प्रचंड पावसाने व महापुराने थैमान!
हिंगोली (CM Relief Fund) : राज्यभरात महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmers) मदतीसाठी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करणार असुन यासाठी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यभरात व विशेषतः मराठवाड्यात प्रचंड पावसाने व महापुराने थैमान घातले असुन असंख्य गावे पुराने वेढली गेली आहेत. हजारो नागरीक पुरात अडकले असुन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लाखो हेक्टर शेतीमधील हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे हिरावला गेला असुन शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करणे बाबत आवश्यक!
अशा परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून, जिल्हा परिषद अभियंता संघटनेने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करणे बाबत स्वेच्छेने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत अभियंता संवर्गाच्या मासिक वेतनातुन एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करणे बाबत आवश्यक निर्देश व्हावेत अशी विनंती करण्यात आली असुन निवेदनावर राज्याध्यक्ष सचिन चव्हाण, महासचिव प्रदीप हुपरे, कोषाध्यक्ष रा. ना. कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मदतीसाठी जि.प अभियंता संघटना सरसावली!
मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. खरीपाची पिके हातची गेल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असुन या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठविले आहे.
– रा. ना. कुलकर्णी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष