दहा एकर शेतामधील 2 सोयाबीनच्या बनमी 15 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञातांनी जाळल्या!
कासार बालकुंदा (Soybeans Burned) : निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा गावातील शेतकरी मुकेश आचार्य पाटील यांच्या सरदारवाडी शिवारातील शेतातील 10 एकर शेतामधील दोन सोयाबीनच्या बनमी 15 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञातांनी जाळल्या.
अशी कृती करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी!
मुकेश पाटील आचार्य यांची शेती खोतीने सरदारवाडी येथील राजू बाबुराव होसुरे हे करत होते. सोयाबीन काढणी करून दोन्ही लावल्या होत्या रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे. शेतात बनमीच्या बाजूला काडीपेटी व एक पिशवी सापडली आहे. काही दिवसापासून बऱ्याच गावांमध्ये व परिसरामध्ये बनून पेटवून देण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या (Farmers) मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. एक तर शेतकऱ्याच्या हातात नराशी आहे दुसरीकडे कसे तरी आलेले सोयाबीन काढून ठेवले असेल अशी कृत्य होत असेल तर शेतकरी भीतीने जगत आहेत. प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम चालू आहे. अशी कृती करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial Aid) द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.