Armori :- आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परीसरात गेल्या महिन्याच्या २९ जुन पासून सततच्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) नदी – नाल्याना मोठ्या प्रमाणात पुर येऊन शेतकर्यांच्या धान पिकाची नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आली आहे तसेच जोगीसाखरा, पाथरगोटा, पळसगाव ,कासवी, आष्टा, अंतरजी,रामपुर, सालमारा , चामोर्शी, कोजबी यासह अन्य गावातील नागरीकांच्या घरांची पडझड झाल्याने नागरीक संकटात सापडले आहेत.
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची नागरीकांची प्रशासनाकडे मागणी
जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून ते ८ जुलैपर्यंत सतत १०ते ११ दिवस पावसाने कहरच केला.नदी- नाल्याना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने नदी-नाल्यालगतच्या शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.यात शेतकर्यांचे रोवलेले धान व ईतर पिके पाण्याखाली बुडून पुर्णपणे सडून जमिन दोस्त झाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे.
जोगीसाखरा येथील रत्नाजी पेन्दाम, अमोल कुमरे, पळसगाव येथील सुनंदा सेलोकर, भास्कर तुपट, बाबुराव गोंधोळे ,विनोद मातेरे , किशोर झलके ,भावना सेलोकर, हिरामण नखाते यांसह अन्य गावातील नागरीकांचे राहते कुळाचे घर पाण्यात भिजुन घराची पुर्णपणे पडझड झाल्याने नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.