भंडारा (Collector Sawan Kumar) : सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अनुषंगाने दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी सावन कुमार (Collector Sawan Kumar) यांनी पवनी तहसील अंतर्गत पेंढरी(पुनर्वसन) गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली असता, गावाची लोकसंख्या ३०० पेक्षा कमी असल्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत देणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. तरी परंतु गावाची ओळख कशी राहू शकेल ह्या साठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तथापि, गावात होणार्या विकासकामांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. यावर ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदविला.
यावेळी जिल्हाधिकार्यांनी (Collector Sawan Kumar) संबंधित विभागांना—व्हीआयडीसी, बीडीओ पवनी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. भेटीच्या वेळी सरपंच, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) लीना फाडके, तहसीलदार किरण वागसकर, गटविकास अधिकारी माने, नायब तहसीलदार शुभदा धुर्वे, उपअभियंता व्हीआयडीसी, मंडळ अधिकारी अंबुळे, तलाठी निशा नागदेवे, संदिप मोटघरे, ग्रामसेवक व सर्व विभागप्रमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते.