सावन कुमार नवे जिल्हाधिकारी
भंडारा (Collector Sawan Kumar) : जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून मावळते जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते (Dr. Sanjay Kolte) यांची बदली करत राज्य शासनाने त्यांना इतरत्र नेमणूक दिली असून, त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार (भाप्रसे) (Collector Sawan Kumar) यांची भंडार्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या २०२५ १२ ऑगस्टच्या आदेशानुसार हा बदल तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. डॉ. संजय कोलते (Dr. Sanjay Kolte) यांनी भंडार्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि विविध विकासकामांना गती दिली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, तसेच कायदा-सुव्यवस्था या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा कार्यकाळ स्थानिकांसाठी संस्मरणीय ठरला आहे.
नवे जिल्हाधिकारी म्हणून येत असलेले सावन कुमार (Collector Sawan Kumar) हे महाराष्ट्र भाप्रसेतील कुशल आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण, जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भंडार्यात त्यांच्याकडून विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व प्रशासन यांच्याकडून व्यक्त होत आहे. राज्य शासनाने जिल्हाधिकारी पदावरील या बदलीबाबत अधिकृत आदेश काढले असून, लवकरच सावन कुमार (Collector Sawan Kumar) भंडार्यातील कार्यभार स्वीकारणार आहेत.