सीसीटीव्हीत टोळके कैद
परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद
परभणी (Girl molested Case) : शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकीस्वार उनाड तरुणाच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणीची छेड काढल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात ७ डिसेंबर रोजी तरुणाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने पोलिस त्या टोळक्याचा शोध घेत आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Girl molested Case) शहरातील नर्सींग कॉलेजच्या काही मुली क्लास करुन गुरुवार ६ डिसेंबर रोजी महात्मा फुले महाविद्यालयाच्या पाठीमागील रस्त्याने दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे येत होत्या. यावेळी त्या मुलींच्या पाठीमागून एक दुचाकीस्वार तरुण आला. त्याने दुचाकी समोर नेऊन पाठीमागे पुन्हा वळवत मुलींच्या दिशेने आला. त्याने सदर महाविद्यालयीन युवतीस कट मारुन अश्लील वर्तन करुन पसार झाला. त्याच्या गाडीवर एमएच. २२बीडी- ०३४१ असा क्रमांक होता.
सदर प्रकार घडल्यानंतर मुलीने आपल्यास भावास कळविला. या प्रकरणी शनिवार ७ डिसेंबर रोजी दोघा बहिण भावाने नानलपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन एमएच. २२ बीडी. – ०३४१ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून पोलिस तरुणाचा शोध घेत आहे. दरम्यान सदर घटना वर्दळीच्या रस्त्यावर भर दिवसा घडल्याने पालकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
दामिनी, चिडीमार पथक गेले कुणीकडे…?
परभणी : मागील काही दिवसापासून शाळकरी, (Girl molested Case) महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग परिसरात थांबणारे उनाड तरुणांचे टोळके मुलींची छेड काढत असतात. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणीसह पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. वास्तविक छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस दलाचे चिडीमार व दामिनी पथक तैनात आहे. मात्र या पथकांच्या कारवाया थंडावल्या आहेत. भर रस्त्यावर असे प्रकार होत असताना पथक अस्तित्वात आहे का नाही? कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक, पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी अशा गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
